पण मी हा असाच

तिला नेहमी वाटायचं...
त्याने माझ्याशी बोलाव , हसावं, मनसोक्त खेळावं
पण तो अबोल.. सगळे कळून शांत राहणारा
मनातल्या मनात कित्येक वादळ शमवणारा
ती म्हणायची , चाल ना रे आपण एकदा फिरायला जाऊ
तो ही कधी नाही म्हणाला नाही तिला
पण त्याचा तो होकार तिला कधीच आनंद देत नव्हता
तिला नकार नको होता, पण त्याचा होकार अन तिला हवा असलेला होकार यात अंतर होत काही
तो गुपचूप... शांत... अगदी सगळ तिच्या मनाप्रमाणे करणारा
पण का कोण जाणे तिला तो रुचत नव्हता तसा..
त्याला हे समजायचे.. तिला तो त्याच्या परीने सार काही द्यायचा पण
पण त्याच प्रेम अन तिला हव असलेल माणूस, यात तो अडकला होता जणू
नेहमी त्याला कळायचं की कधी तिला हव आहे त्याच्याशी रुसक भांडण
अन मग त्याच तिला समजावण, लाडीगोडी लावण
पण तो निष्प्रभ होता, प्रेमाच्या सीमा त्याने कधीच ओलांडल्या होत्या
त्याला तिच्याशी भांडण कधी जमतच नव्हत
तिला नुसत प्रेम अन प्रेम कारण एवढच माहीत होत त्याला
ती नेहमी त्याच्या त्या लटक्या रागाच्या शोधात...
अन तो नेहमी तिच्या चेहऱ्यावरील हास्याच्या शोधात
शोधांमध्ये हरवलं होत जीवन.. सगळ होत जवळ पण आपल अस काहीच होईना हा हताश विचार मनी
असाच असत न हो माणसाच... नेहमीच अती काही झाल की नकोस होत कधी
कधी हवा असतो राग, मग तो निवळला की दिसणार प्रेम...
जणू तो राग म्हणजे काळेभोर ढग, अगदी घाबरवून सोडवणारे
घर वाहून जाईल अशी भीती घालणारे
अन त्यानंतर जाणवणारे प्रेम , जिव्हाळा म्हणजे ते लक्ख उन
मनाला हव हवास वाटणारे
त्या उन्हाच्या प्रतीक्षेतच, माणूस कितीही पाउस झेलायला तयार होतो
बस , मी ही असाच
रागवणारा , तुझे प्रेम न जाणणारा
पण तुझा सहवास, तुझी मैत्री हवीहवीशी वाटणारा
आपले भांडण , तुला चिंब भिजवणारे ...
माझे शब्द, तुला गारठवणारे
पण मी हा असाच...
कधी पाऊस बनून भिजवणारा... तर कधी त्यानंताच्या इंद्रधनुत दिसणारा

No comments: