मी दर वर्षी तिरुपतीला जातो. मला दक्षिण भारत खुप छान वाटतो. तिकडे गेल्यानंतर मन प्रसन्न वाटत. अन देवाच्या सानिध्यात काही वेळ घालवण मला नेहमीच आवडत. मागच्या वर्षी जुलै मध्ये मी मीत्रांसमवेत तिकडे गेलो होतो. तिरुपतिवरून येताना आम्ही कोल्हापुरला देवीच्या दर्शनासाठी जायचे ठरवले. कोल्हापुरला दर्शन घेतले व येताना गणपती पुळे मार्गे यायचे ठरले.आम्ही तिथे रात्री २ च्या सुमारास पोहोचलो. रात्री २ वाजता खोली भाड्याने मिळणे तस अशक्यच काम होत. तेव्हा आम्ही गाडीतच झोप घ्यायचे ठरविले. गाडी समुद्राच्या अगदी जवळ लावली अन त्यातच झोपलो. गाडीत काही नित झोप येत नव्हती. अन त्यात त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा भयान अवाज येत होता.पहाटे ५:३० पर्यंत कसे तरी एक झोप घेतली अन मग उठलो. गाडीबाहेर आलो अन समोर अथांग असा समुद्र पाहिला. जरी सूर्योदय तिथे पहायला मीळणार नसला तरी पहाटेच्या कोवळया कीरणांमध्ये समुद्राचे रूप काही औरच दिसत होते. अगदी नीरव शांतता होती अन फ़क्त लाटांचा आवाज येत होता. मी बराच वेळ समुद्रापाशी बसून त्याचे ते लोभसवाने रूप न्याहाळत होतो. तिथे फ़क्त मी, अन तो अथांग पसरलेला सागर अन नुकताच उगवलेला सूर्य आम्ही तिघेच जागे असल्याचा भास मला होत होता. मध्येच कुठेतरी कुजबुज करीत पक्षी त्यांचीही उपस्थिती जाणवून देत होते.
थोड्याच वेळात माझा एक मित्र गाडीतून बाहेर आला. मग मला राहवेना, मला त्या तुदुम्ब भरलेल्या सागरात पोह्न्याची खुप इच्छा झाली. मी व मित्र , आम्ही दोघे अगदी क्षणात त्या सागराच्या लाटांना तोंड देण्यास समर्थ झालो. क्षणही न दवडता आम्ही त्या सागराच्या पाण्यात तुदुम्ब भिजलो. उगाचच आनंदाने ओरडत , त्या लाटांना तोंड देत त्यांचा आवाज आपल्या आवाजाने क्षीण करण्याचा प्रयत्न करू लागलो.आमचा गोंधळ पाहून बाकीचे मीत्रही जागे झाले. ज्याना पोहता येत होत ते थेट आमच्यात येउन सामील झाले तर ज्याना पोहता येत नव्हत त्यानी सुरक्षा म्हणुन अगदी २ फुट पाण्यातच उभे राहाणे पसंत केले. आम्ही मग त्याना हिणवत कधी खुप आत जात तर कधी लाटांच्या पाण्यावर तरंगत अगदी त्यांच्या पाशी येत. खुप आनंद वाटत होता. अन मीत्रांच्या ग्रुप मध्ये असे एन्जॉय म्हणजे एक पर्वणीच असते. आम्ही खुप वेळ त्या पाण्यात होतो. अगदी न थांबता, न थकता आम्ही त्या लाटांमध्ये खेळत होतो. भूक तर शब्दशा हरवलीच होती. दुपारचे शाधारण १२ वाजले होते. लाटांची तीव्रता काही वाढली होती. पण आनंदाच्या नादात आम्हाला त्याची जाणीवही नव्हती अन फिकीरही नव्हती.

2 comments:
वाचताना अंगावर काटा आला.. प्रत्यक्ष अनुभवताना काय वाटल असेल याची कल्पना केली तरी भीती वाटते..
छान लिहितोस तू. फक्त एकच सुचवावेसे वाटते (जर तुला राग येणार नसेल तर) - मराठी लिहीताना काही ठिकाणी 'न' ऐवजी 'ण' किंवा उलट 'ण' ऐवजी 'न', 'ड' ऐवजी 'द' अस लिहील गेलय. तुझ्या 'काव्यांजली' या ब्लॉगवरही हे जाणवल.
वाचताना अस काही जाणवल की चुकल्यासारख होत.
ही कमेंट पब्लिश केली नाहीस तरी चालेल.
Thanks for your comment..its too late reply though :)
Post a Comment