वेळ आली होती पण काळ आला नव्हता !!!

मी दर वर्षी तिरुपतीला जातो. मला दक्षिण भारत खुप छान वाटतो. तिकडे गेल्यानंतर मन प्रसन्न वाटत. अन देवाच्या सानिध्यात काही वेळ घालवण मला नेहमीच आवडत. मागच्या वर्षी जुलै मध्ये मी मीत्रांसमवेत तिकडे गेलो होतो. तिरुपतिवरून येताना आम्ही कोल्हापुरला देवीच्या दर्शनासाठी जायचे ठरवले. कोल्हापुरला दर्शन घेतले व येताना गणपती पुळे मार्गे यायचे ठरले.आम्ही तिथे रात्री २ च्या सुमारास पोहोचलो. रात्री २ वाजता खोली भाड्याने मिळणे तस अशक्यच काम होत. तेव्हा आम्ही गाडीतच झोप घ्यायचे ठरविले. गाडी समुद्राच्या अगदी जवळ लावली अन त्यातच झोपलो. गाडीत काही नित झोप येत नव्हती. अन त्यात त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा भयान अवाज येत होता.पहाटे ५:३० पर्यंत कसे तरी एक झोप घेतली अन मग उठलो. गाडीबाहेर आलो अन समोर अथांग असा समुद्र पाहिला. जरी सूर्योदय तिथे पहायला मीळणार नसला तरी पहाटेच्या कोवळया कीरणांमध्ये समुद्राचे रूप काही औरच दिसत होते. अगदी नीरव शांतता होती अन फ़क्त लाटांचा आवाज येत होता. मी बराच वेळ समुद्रापाशी बसून त्याचे ते लोभसवाने रूप न्याहाळत होतो. तिथे फ़क्त मी, अन तो अथांग पसरलेला सागर अन नुकताच उगवलेला सूर्य आम्ही तिघेच जागे असल्याचा भास मला होत होता. मध्येच कुठेतरी कुजबुज करीत पक्षी त्यांचीही उपस्थिती जाणवून देत होते.
थोड्याच वेळात माझा एक मित्र गाडीतून बाहेर आला. मग मला राहवेना, मला त्या तुदुम्ब भरलेल्या सागरात पोह्न्याची खुप इच्छा झाली. मी व मित्र , आम्ही दोघे अगदी क्षणात त्या सागराच्या लाटांना तोंड देण्यास समर्थ झालो. क्षणही न दवडता आम्ही त्या सागराच्या पाण्यात तुदुम्ब भिजलो. उगाचच आनंदाने ओरडत , त्या लाटांना तोंड देत त्यांचा आवाज आपल्या आवाजाने क्षीण करण्याचा प्रयत्न करू लागलो.आमचा गोंधळ पाहून बाकीचे मीत्रही जागे झाले. ज्याना पोहता येत होत ते थेट आमच्यात येउन सामील झाले तर ज्याना पोहता येत नव्हत त्यानी सुरक्षा म्हणुन अगदी २ फुट पाण्यातच उभे राहाणे पसंत केले. आम्ही मग त्याना हिणवत कधी खुप आत जात तर कधी लाटांच्या पाण्यावर तरंगत अगदी त्यांच्या पाशी येत. खुप आनंद वाटत होता. अन मीत्रांच्या ग्रुप मध्ये असे एन्जॉय म्हणजे एक पर्वणीच असते. आम्ही खुप वेळ त्या पाण्यात होतो. अगदी न थांबता, न थकता आम्ही त्या लाटांमध्ये खेळत होतो. भूक तर शब्दशा हरवलीच होती. दुपारचे शाधारण १२ वाजले होते. लाटांची तीव्रता काही वाढली होती. पण आनंदाच्या नादात आम्हाला त्याची जाणीवही नव्हती अन फिकीरही नव्हती.


तेवढ्यात आमच्यातल्याच एकाच्या सुपिक डोक्यात एक कल्पना आली. एकमेकांचे हात धरून लाटांना सामोरे जायच. जेवढ्या लाटा तोड़ता येतील तेवढे चांगल. आम्हीही काहीतरी वेगळ म्हणुन ते मान्य केल. २ लाटांना आम्ही सक्षमपने सामोरे गेलो. पण पुढच्या लाटेची तीव्रता काही औरच होती. त्या लाटेत आमचे हात सुटले अन ग्रुप सुटला. एक ग्रुप असल्याने आम्ही समुद्राच्या बरेचसे आत गेलो होतो. पण आता आम्ही सर्वजन एकेकटे होतो. समोर सगळे दिसत होते पण कोणाचा हात पकड़ता येत नव्हता. पाण्याला वेगही भरपूर होता. शेवटी मनाने आपोआपच बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. एव्हाना किमान ५ ते ६ तास खेळत असल्याने आणी नुकतेच 3-४ लाटांना सामोरे गेल्याने सर्वच जन पुरेसे दमले होते. तेव्हा बाहेर जायला निघालो. पण दैव....
ज्या लाटांना आम्ही ग्रुपने सामोरे गेलो होतो त्या आता किनारयाला धडकून परतीच्या मार्गावर होत्या. अन त्यांचा वेग कदाचीत ओहोटी असल्याने कीवा कोण जाने कोणत्या कारणाने , खुपच वाढला होता. त्यांचा वेग आता एवढा वाढला होता की समुद्रातून बाहेर येनारया लाटा, ज्या आम्हाला त्या क्षणी आत्यांतीक गरजेच्या होत्या, त्या क्षीण पडत होत्या. आम्ही कीनार्याकडे तोंड करून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात असताना समुद्रातून लाटा बाहेर येतच नव्हत्या. फ़क्त आमच्या समोरून लाटा आत समुद्रात जात होत्या. लाटांची दीशाही अशी जीवघेणी झाली होती की लाटा बाहेर येताना आमच्यापासुन काही दूरपासून जात होत्या अन परत फिरताना मात्र आमच्यासमोर येत होत्या. त्या वेळी नक्की वाटत होते की वेळ आली आहे. त्याच भयाण वातावरणात सगळे एकमेकांकडे मदतीच्या आशळ्भुत नजरेने पाहत होते. काही वेळापुर्वी ज्या डोळ्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता , त्याची जागा आता भीती अन हताशपणाने घेतली होती. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. काहीसा शिल्लक असलेला अंगातील त्राणही आता त्याची संपल्याची साक्ष देत होता.  कीनारा समोर दिसत होता, पण लाटांना तोडून तिथे पोहोचण केवळ अशक्य वाटू लागल होत. एक पाउल पुढे टाकाव तर पुढचीच लाट पायाखालील मातीसह ४ पाउले मागे नेट होती. जस समुद्र बोल्वाताच होता जणू. आता सहनशीलताही संपू लागली होती. जगण्याच्या ओढीपेक्षा हताशपणाच पारड कुठेतरी जड़ झाल्याच वाटू लागल होत. हा निसर्गाचा अनोखा वीक्राळ खेळ किमान घड़याळी २ मीनीटे चालला होता. आता आशा होती ती फ़क्त समुद्राच्या कृपेची. त्या काही लाटांची ज्या समुद्रातून बाहेर येताना आम्हाला बाहेर काढणार होत्या.
 बस !!! अखेर २ मिनिटाच्या त्या अभूतपूर्व संघर्षानंतर अखेर ती लाट आली. अन अशी आली की ती थेट आम्हाला ६-७ फुट बाहेर घेउन आली. त्यानंतर तिच्या मागील छोट्या लाटेने आम्हाला बाहेर पोहोच्वान्याच काम केल. बस काहीही वेळ न दवड़ता, जस सकाळी समुद्रात अगदी क्षणात आत गेलो होतो , अगदी तसाच किंवा त्याही पेक्षा वेगाने समुद्राच्या बाहेर आलो.  जाताना जो आनंद होता त्याही पेक्षा किंचीत जास्त भय घेउन सर्व जण बाहेर पोहोचलो. आधी नजर सर्वाना शोधू लागली. सर्व जण आले तर आहेत ना याची खात्री मनोमन करू लागली. तोंडातून शब्दही फुटेना अन समुद्राकडे नजरही करवेना. अगदी सुन्न झालो सगळे. त्या लाटांचा आवाज काही वेळ काहीच ऐकु येइना. सकाळी जाणवलेली नीरव शांतता आता भयाण शुकशुकाटात बदलली होती.



वीहीरीत कींवा नदीत पोहायला तसे मी व माझे २-३ मित्र अगदी निष्णात, पण समुद्राच्या त्या भयाण ताकतीपुढे आमचा नीभावच लागत नव्हता. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्र खुपच खवळला होता. काही वेळ बाजूला बसून शांत झाल्यानंतर समुद्राकडे पाहीले. त्याचे ते रौद्र रूप आम्हाला जणू भीती घालत होते. प्रत्येक लाट वाघाच्या डरकाळीप्रमाणे आ वासूण उभी रहात होती. त्याचे कड़े पहावतही नव्हते. एवढ्या जवळून मरण मी कधीच पाहीले नव्हते. आम्ही तिथून तडक मंदिरात गेलो. देवाचे दर्शन घेतले व या प्रसंगातून बचावल्याबद्दल त्याचे मनोमन आभार मानले. लगेचच गाडीत बसलो व परतीच्या वाटेला लागलो. काहीसे अन्तर कापल्यानंतर आम्ही एक उंच ठीकाणी पोहोचलो , मी खिड़कीची काच उघडली अन समुद्राकडे एक नजर टाकली. एवढे भयाण अन रौद्र रूप मी कधीच पाहीले नव्हते, त्याचे ते रूप मनात खोलपर्यंत साठले गेले.  मनात एक विचार घर करून गेला... खरच "आज वेळ आली होती पण काळ आला नव्हता"!!!

Sac...